Tuesday, February 6, 2024

shrddha farm

"We are no less than the city girls" 
What an example of womenempowerment 
Shraddha Dhawan, a 20 yr young farmer and a daughter of a smallholder dairy farmer from Nighoj (Ahmednagar, Maharashtra) will make society change their views about smallholders.

With the guidance of her disabled father, she started managing her own dairy farm, when she was in 10 th std. Now she manages a big farm of 80 buffaloes. Also, she learned to drive a #bolero vehicle to carry 450 Ltrs of milk daily. 

"When my schoolmates were going to school, I was driving our vehicle to dairy, making me awkward initially, however, I had to take the responsibility of family and so I learned all the skills of dairy farming" Sharddha shares her journey.
 
She has also managed to scale up her business without quitting her education. She is doing her graduation in science and also trying to help other girls to become independent. 

"We are no less than the city girls" Shradhha speaks with confidence.

These smallholders do lots of hard work, are equally skilled and educated, and deserve all the good things in their lives.

#swikrutiagroclinic salute to this young lady for #inspiring all of us.

#empower_girls #education
#girlseducation #nonprofits #womenempowerment
#girlseducationmatters
#girls #charity #savegirlchilds
#womenempowerment #fundraiser #school #savegirlchilds #unicef #unicefindia #unwomen #girlrising

कापूस पीक सल्ला

#कापूस पिकामध्ये वातावरण सद्यपरिस्थिती ढगाळ असल्याकारणाने मावा व तुडतुडे प्रादुर्भाव जाणवतो
 कीटकनाशकाची फवारणी आवश्यकतेनुसार करावी.
कापूस पिकामध्ये मावा नियंत्रणासाठी  इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) १०  ग्रॅम + रिडोमिल गोल्ड ५० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्य ३० ग्रॅम १५ लिटर पंप

सोयाबीन लागवड

#सोयाबीन_पिकासाठी जमीन मध्यम ते भारी ,चांगला निचरा होणारी. जमीन खोल नांगरून उभ्या-आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत १० ते १२ गाड्या एकरी वापरावे.
#सोयाबीन_अधिक उत्पादनासाठी सुधारित जाती 🌱🌱🌱*सोयाबीन बियाणे*🌱🌱🌱
*के डी एस फुले संगम ७२६, फुले किमया ७५३, फुले दुर्वा ९९२,३३४४जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३,फुले अग्रणी (केडीएस ३४४) या जातीची पेरणी करू शकता. 
#लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते.पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. तर दोन रोपातील अंतर १० सेमी असावे.सोयाबीनचे एकरी २८_३० किलो बियाणे लागते . सोयाबीन उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
#खत_व्यवस्थापन १२/३२/१६ ५० किलो + गंधक १० किलो किंवा २०/२०/००/१३ ५० किलो एकरी द्यावे सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.
#अंतरपीक -तूर + सोयाबीन , कापूस + सोयाबीन .
#रोग_किडी व्यवस्थापन
लागवडीनंतर १० – १५ दिवसांत १९:१९:१९ -१०० ग्राम + सूक्ष्म अन्नदरव्य २५ ग्राम .१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पेरणीनंतर तणनियंत्रणासाठी १५ ते २१ दिवसादरम्यान शकेद ८०० मिली प्रति एकर फवारावे ( ७ लिटर पाणी + ८०० मिली शकेद + ३०० ग्राम बॉस्ट (सोबत पॅकिंग मध्ये असते ) एकत्र चांगले मिसळून फवारणी पंप किती होतात त्या सम प्रमाणतात मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणी केल्यानंतर साधारण पाने पिवळी पडतात त्यावर ५ व्या दिवशी युरिया ३० ग्राम +फेरस सल्फेट ५० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  फुलोरा अवस्थेत -२० टक्के बोरॉन-१५ ग्राम + टाटा बहार ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी 
  शेंगा पासत असतांना -००:५२:३४- १५० ग्राम + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
   रोग व किडी -पाने खाणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या आळ्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कराटे २० मिली /हमला ५५० -३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी . 
रोग -प्रतिबंधत्म्क पहिली फवारणी कॉनटॉफ प्लस ४० मिली /१५ लिटरपाणी दुसरी फवारणी अंतराकॉ ल ४० ग्राम /१५ लिटर पाणी 
सोयाबीन ची काढणी ९५ टक्के पाने गळुन शेंगा तपकिरी रंगाची झाल्यावर करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क..
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #सोयाबीन https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

शेती विषयक सल्ला

#नमस्कार_शेतकरी बांधवांनो,
सध्या #जुन्नर , #आंबेगाव , #मावळ या भागातील पीक पाहणी करत असताना असे निदर्शनात आले की शेतकरी वर्ग आधुनिक पद्धतीने शेती करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत.
 #सोशल_मीडियचा वापर करून शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. #कोरोना महामारीत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना भेटत नाही. अवकाळी पावसासोबत बाजारभाव व मालाची गुणवत्ता या कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

 #कृषी_क्षेत्रात बदल होणे अपेक्षित आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार शेतीमालाच्या उत्पादनाकडे वळणे. बहुतांश शेतकरी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्याप्रमाणे स्वतः ला आवडेल त्या पिकाचे उत्पादन घेतात, त्यामुळे बाजारात एकाच वेळी मालाचे #बाजारभाव कोसळतात.

#सोशलमीडिया वर नवीन एखादे मॉडेल आले आहे ते म्हणजे #जिरेनियम_शेती. 

_ जिरेनियम शेती सदर उत्पादन मार्केट मध्ये उपलब्ध आहे का ?
_ उत्पादनास मागणी आहे का ?
_ शेतीचे अर्थशास्त्र ते आधी सांगतात यामध्ये तुम्हाला ठराविक गुंतवणूक करावी लागते का ? 
 _आपण पैसे गुंतवणूक करून आपल्याला त्यामागील मिळणारे उत्पादन लाखो मध्ये सांगितले जाते खरच लाखो मध्ये उत्पादन मिळणे शक्य होते का ? 
 _ होत असेल तर ती ठराविक कंपनी स्वतः उत्पादक का घेऊ शकत नाही ?
 या सर्व प्रश्नांचा अभ्यास शेतकरी बांधवांनी करावा.

अशा मॉडेलमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे .
सदर असे मॉडेल चालवणारे कंपनी मालक हे लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे नातेवाईक असतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही. महोगनी, कोरफट, अमेरिकन केशर, कडकनाथ,शतावरी,अश्वगंधा,व्हरटीकल फार्मिंग अशा विविध कंपनी मार्केटिंग ने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

  #स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक परिवाराकडून विनंती आहे की,
आपल्या भागातील बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीमध्ये उत्पादन घ्यावे. 
अशा कोणत्या ही मॉडेलच्या आहारी जाऊ नये.

#शेतकरी सेवार्थ...

अधिक माहितीसाठी संपर्क..

#swikrutiagro #swikrutiagroclinic https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📲 https://bit.ly/2miyhzj

 #𝕾𝖜𝖎𝖐𝖗𝖚𝖙𝖎𝕬𝖌𝖗𝖔𝕮𝖑𝖎𝖓𝖎𝖈
           धन्यवाद !!!

मधमाशी पालन

#मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे. त्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 20 मे हा दिवस साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 ला मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार 20 मे हा दिवस 'जागतिकमधमाशीदिन' म्हणून घोषित करण्यात आला.
आपण करत असलेल्या बदलांमुळे, वापरत असलेल्या कीटकनाशकांमुळे मधमाशा संकटात आहेत. त्यातच एक पीक पद्धती आणि पाण्याची टंचाई हेही एक महत्त्वाचं कारण आहे.. . . . . .. आज जागतिक  मधमाशी दिवस २० मे आहे. त्यानिमित्त आपण या छोट्या पण आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक जीवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या वागण्यात काही बदल करूया.
🔸मधुमक्षिका पालन ,स्वतः करणे ,
🔸शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ,
🔸मध व उपपदार्थ संकलन प्रोजेक्ट मध्ये 
     गुंतवणूक करणे
🔸मध पेटी ,निर्मिती व भाडेतत्त्वावर देणे 
      अशी संधी आहे. 
शेतकऱ्यांना या मध्ये फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे 
✨दर्जेदार पीक व फळ उपलब्धता
✨गुंतवणुकीपासून आर्थिक फायदा
     ४० प्रकारचे व्यवसाय उपलब्ध 
✨औषधी उपयोगासाठी विक्री ची संधी
       १९ प्रकारचे औषधी मध मिळतात
.🐝 मधमाशी 🐝 केवळ एक जीव नसून 
आपली तारणहार आणि आर्थिक स्थिती सुधारू शकणारी मित्रजीव आहे हे लक्षात ठेवूया
आणि तिच्या मदतीने आयुष्य # अर्थपूर्ण 💰  करूया 😍
Pic@tumblr
💠थेंबे थेंबे तळे साचे 💧💧 
#जगतिकमधमाशीदिन
#swikrutiagroclinic #swikrutiagro

शेती विषयक सल्ला

#नमस्कार_शेतकरी बांधवांनो,
सध्या #जुन्नर , #आंबेगाव , #मावळ या भागातील पीक पाहणी करत असताना असे निदर्शनात आले की शेतकरी वर्ग आधुनिक पद्धतीने शेती करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत.
 #सोशल_मीडियचा वापर करून शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. #कोरोना महामारीत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना भेटत नाही. अवकाळी पावसासोबत बाजारभाव व मालाची गुणवत्ता या कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

 #कृषी_क्षेत्रात बदल होणे अपेक्षित आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार शेतीमालाच्या उत्पादनाकडे वळणे. बहुतांश शेतकरी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्याप्रमाणे स्वतः ला आवडेल त्या पिकाचे उत्पादन घेतात, त्यामुळे बाजारात एकाच वेळी मालाचे #बाजारभाव कोसळतात.

#सोशलमीडिया वर नवीन एखादे मॉडेल आले आहे ते म्हणजे #जिरेनियम_शेती. 

_ जिरेनियम शेती सदर उत्पादन मार्केट मध्ये उपलब्ध आहे का ?
_ उत्पादनास मागणी आहे का ?
_ शेतीचे अर्थशास्त्र ते आधी सांगतात यामध्ये तुम्हाला ठराविक गुंतवणूक करावी लागते का ? 
 _आपण पैसे गुंतवणूक करून आपल्याला त्यामागील मिळणारे उत्पादन लाखो मध्ये सांगितले जाते खरच लाखो मध्ये उत्पादन मिळणे शक्य होते का ? 
 _ होत असेल तर ती ठराविक कंपनी स्वतः उत्पादक का घेऊ शकत नाही ?
 या सर्व प्रश्नांचा अभ्यास शेतकरी बांधवांनी करावा.

अशा मॉडेलमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे .
सदर असे मॉडेल चालवणारे कंपनी मालक हे लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे नातेवाईक असतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही. महोगनी, कोरफट, अमेरिकन केशर, कडकनाथ,शतावरी,अश्वगंधा,व्हरटीकल फार्मिंग अशा विविध कंपनी मार्केटिंग ने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

  #स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक परिवाराकडून विनंती आहे की,
आपल्या भागातील बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीमध्ये उत्पादन घ्यावे. 
अशा कोणत्या ही मॉडेलच्या आहारी जाऊ नये.

#शेतकरी सेवार्थ...

अधिक माहितीसाठी संपर्क..

#swikrutiagro #swikrutiagroclinic https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📲 https://bit.ly/2miyhzj

 #𝕾𝖜𝖎𝖐𝖗𝖚𝖙𝖎𝕬𝖌𝖗𝖔𝕮𝖑𝖎𝖓𝖎𝖈
           धन्यवाद !!!

कापूस आकस्मित मर

#कापूस 
#आकस्मिक_मर_रोग

लक्षणे :–
पावसाचा पडलेला खंड त्यानंतर चार पाच दिवसांनी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास किंवा दिवसाचे तापमान ३८ सें.पेक्षा जास्त दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. 
पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. 
झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पाने निस्तेज होतात.
पाने पिवळी पडतात.
 पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.

उपाययोजना:-
• वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये.
• पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. 
• विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच २४ तासाच्या आत यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी ब्ल्यू कॉपर ५०० ग्रॅम किंवा  एम ४५ ५०० ग्रॅम +  युरिया १.५ किलो +  पालाश १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोजल काढून आळवणी / ड्रेंचींग करावी प्रती झाडास १५० ते २०० मि.लि. द्यावे यासाठी पायाचा अंगठा व पायाचे पहिले बोट यामध्ये झाडाचे बूड पकडून पायाने झाडाच्या बुडाजवळची माती मोकळी करून झाडाला थोडा तिरपा बाक द्यावा. त्यानंतर आळवणी केल्यास जास्त फायदेशीर सिद्ध होते. तसेच झाडाला बुडाशी दोन्ही बाजूने पायाने दाबावे. 
• त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी (१८/४६/००) १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
           शेतकरी सेवार्ध.. 
अधिक माहितीसाठी संपर्क
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #कापुस https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

रब्बी ज्वारी

#रब्बी_ज्वारी:-
बियाणे व बीजप्रक्रिया:-
रब्बी ज्वारी  सुधारित वाण -
१)  हलकी जमीन (खो ३० सेमी ) -फुले अनुराधा,फुले माऊली  २) मध्यम जमीन (खो ६० सेमी ) - परभणी मोती, मलदांडी ४५ ,फुले सुचित्रा ,फुले माऊली 
३) भारी जमीन ( खो ६० सेमी पेक्षा जास्त )-  फुले वसुधा ,फुले यशोदा 
४) बागायातीसाठी-  फुले रेवती फुले वसुधा
५) हुर्ड्यासाठी - फुले उत्तरा, फुले मधुर 
६)लाह्यासाठी - फुले पंचमी 
७) पापडासाठी - फुले रोहिणी
#बियाणांचे_प्रमाण_आणि_बीजप्रक्रिया :
हेक्‍टरी १० किलो बियाणांची शिफारस आहे. घरचे बियाणे वापरताना काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी ३०० मेश गंधक ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आणि पेरणी उशिरा झाल्यास खोडमाशीच्या नियंत्रणासाठी....थायोमेथोक्‍झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी. 
चाऱ्यासाठी ज्वारी लागवड करताना एकरी १६ किलो बियाणे दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवून दाट पेरावे.
रासायनिक खताचा वापर :
जिरायती रब्बी ज्वारीसाठी हेक्‍टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणी बरोबरच तर ओलिताखालील रब्बी ज्वारीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश वापरावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी....पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.खत आणि बियाणे खोल १२ सेंमीपर्यंत पेरून दिल्यास ओलाव्याचा कार्यक्षम वापर होतो. पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र हेक्‍टरी दिल्यास सुद्धा चांगला फायदा होतो.
    अधिक माहितीसाठी संपर्क
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #रब्बी_ज्वारी  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

धुक्यात कांदा पीक

#धुक्यात_कांदा पिकाची काळजी अशी घ्यावी.??
   __कांदा पिकाचे शेंडे पिवळे होण्यास सुरुवात होते. 
 __ कांद्याची पात झुकलेले दिसतात.
 __ धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.
कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान १० ते १२ दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. 

हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव  साठलेले असते ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याचे फवारणी करू शकता.त्यामुळेपातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.दुसरा उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

 धुके ज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये. तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता.

 ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर  किंवा रेन पाइप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.

 - कांदा पिकाला रोजच्यारोज फवारणीची आवश्‍यकता नसते. मात्र रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसातून एकदा बुरशीनाशक अधिक  सिलिकॉन फवारणी करावी. शक्यतो द्रव स्वरूपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.

_ सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे.
शेतकरी सेवार्थ ..
स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक 🌾
https://instagram.com/swikruti.agro
https://swikrutiagroclinic.blogspot.com/
https://www.youtube.com/channel/UCTza8UL6zkqih2d75ZWm-FA
https://g.co/kgs/u4P4bV
https://t.me/swikruti
📲   https://bit.ly/2miyhzj

वाटाणा लागवड

#वाटाणा_लागवड
वाटाणा लागवड हे रब्बी हंगामात पश्चीम व उत्तर महाराष्ट्रात वाटाणा हे पिक चांगलेच महत्वाचे आहे.वाटणा या पिकांची सातारा, नाशिक, बडोदे, अहमदनगर, खानदेश, पुणे या सारख्या ठिकाणी लागवड अधिक केली जाते.
वाटाणा या पिकाला हॉटेलमध्ये चांगल्याप्रकारे मागणी आहे. वाटणा लागवड पीक जमिनीच्या आतमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करत असते, यामुळे होते हे कि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 
#जमीन_व_हवामान :-
रब्बी हंगाम वाटणा लागवड या पिकाला जास्त फायदा होतो. पीक वाढीसाठी अंदाजे दर महिन्याचे सरासरी तापमान  १० ते २२ अंश से. असावे. वाटाण्याच्या बिया उगवण्याकरिता २२ अंश से. तापमान हे अनुकूल तापमान आहे. वाटाणाच्या पिकाच्या लागवडीसाठी सुपीक, मध्यम ,पाण्याचा उत्तम निचरा होणारी  अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५  इतका असावा.लागवडपुर्व मशागतीला या पिकात खूप महत्त्व आहे. त्यासाठी जमिनीची एकवेळा नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुशीत करून लागवड करावी.
#वाटाणा_अधिक उत्पादनासाठी सुधारित जाती जी एस १० ,इडम ग्रीनवुड ,सलोनी, ए पी ३, नुजिविडू केरोल,
नामधारी एन एस ११००, या जातीची पेरणी करू शकता.
 #वाटाणा_लागवड पिकाची वर्षातून दोन हंगामांत लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच रब्बी हंगामात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात करावी. लागवडीसाठी सपाट वाफे किंवा सरी -वरंबे या पद्धतीचा अवलंब करता येतो.  सपाट वाफ्यात ६० सें.मी.x ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. सरी वरंब्यावर लागवड करावयाची असल्यास ६० सें.मी. अंतरावर सऱ्या सोडाव्यात. सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने किंवा पाभरीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने लागवड केल्यास रोपांमधील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे. टोकण पद्धतीने एकरी  ८ ते १० किलो लागते.पेरणी पद्धतीने २० ते २५ किलो एकरी लागते.
#खत_व्यवस्थापन :-
१२/३२/१६ - ५० किलो किंवा १५/१५/१५ - ५० किलो किंवा  १४/२८/१४ - ५० किलो  + गंधक १० किलो पेरणी करताना एकरी द्यावे .
#रोग_किडी_व्यवस्थापन :-
    - १५ व्या दिवशी पाण्यातून ह्युमिक ५०० ग्रॅम +साफ ५०० ग्रॅम +  १९/१९/१९ ५ किलो एकरी पाण्यातून द्यावे.
    - १७ व्या दिवशी रोगर -६० मिली + एम ४५ - ६० ग्रॅम + हमला ५०५ - ५० मिली  २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    - २१ व्या दिवशी खुरपणी किंवा तणनाशक परा सूट  ( imazathapyr 10% sl ) मारावे
    - २५ व्या दिवशी २४/२४/०० ५० किलो द्यावे गंधक पावडर धुरळणी करावी.
     - २७ व्या दिवशी अंट्राकॉल ५० ग्रॅम + प्रोफेक्स सुपर ५० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
     - ३२ व्या दिवशी टाटा बहार ४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पुन्हा ही फवारणी ६ व्या दिवशी घ्यावी. 
      - ४५ व्या दिवशी पाण्यातून सल्फर ९० % ३ किलो + युरिया १किलो पाण्यातून द्यावे. 
गरज पडल्यास अळी व भुरी साठी फवारणी करावी सल्फर ४० ग्रॅम + एकलक्स ४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी. 
      _५५ ते ६० व्या दिवशी तोडणी सुरू करावी. 
#पाणी_व्यवस्थापन :-
वाटणा पिकाला इतर भाजीपाल्यांप्रमाणे पाणी लागत नाही वाटणा या पिकाला कमी पाणी लागते. वाटणा लागवड नंतर या पिकाला हलके पाणी द्यावे लागते. पाण्याची दुसरी पाळी हि फुल धरण्याच्या काळात आणि  तिसरी शेंगामध्ये दाने भारत असताना द्यावी लागते. जमीन वाळूमिश्रित आणि हलकी असल्यास याला नियीमित पाणी द्यावे.
#काढणी_व_उत्पादन :-
वाटाणा हे पिक कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ६५ दिवसात काढणी करावी.
 या शेंगाचा गडद आणि हिरवा रंग बदलून त्याला  फिक्कट व हिरव्या रंगाच्या आणि टपोऱ्या दिसू लागतात. काढणी ३ ते ४तोड्यात पूर्ण होऊन जाते.
        वाटणा हे पिक लवकर येणाऱ्या जातीचे असून हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन हे सरासरी १५ ते १८ क्विंटल आणि मध्यम कालावधी मध्ये तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन अंदाजे २५ ते ३० क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे साधारणता ३० ते ४० क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते. 

Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

आंबा मोहोरगळ

#आंबा_पिकामध्ये_मोहोरगळ थांबवण्यासाठी पुढील फवारणी करावी 
तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी व्हर्टिसिलियम लेकॅनी या मित्र बुरशीवर आधारित कीटकनाशकाची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसल्यास पुढील फवारणी - 
इमिडाक्लोप्रिड १७.८% एस एल – २.५ मिली आधिक कार्बेनडीझम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यू पी - २ ग्रॅम.प्रती लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.गरज भासल्यास पुढील फवारणी मध्ये थायोमेथोक्साम २५% डब्ल्यू जी ०.५ ग्रॅम अधिक झिनेब ६८% + हेक्साकोनॅझोल ४% डब्ल्यू पी २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

हरभरा

#हरभरा
फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. म्हणून पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

ऊसातील पाचट

_ #ऊसातील_निघालेले_पाचट कधीही जाळू नये.
_ ऊसतोडणी झाल्यानंतर ते पूर्ण रानात एक समान पसरावे.
_ त्यानंतर त्यावर युरिया ५० किलो व सिंगल सुपर फॉस्फेट १०० किलो अधिक जिवाणू ५ किलो मिसळून द्यावे.
_ पाणी दिल्यानंतर कुजण्यासाठी मदत होईल .
_ ऊसाच्या पाचटाचे कर्ब नत्र गुणोत्तर १२०/०१असते .
_ गुणोत्तर कमी करण्यास नत्र उपयोगी पडते.
_ सुपर फॉस्फेट मध्ये फॉस्फरस पाचट  कुजवण्याऱ्या सूक्ष्म जीवना अन्न उपलब्ध करून देते.
_ कर्ब नत्र गुणोत्तर जेवढे कमी तेवढे पाचट लवकर कुजते. 
_ जमिनीला सेंद्रीय पदार्थ जास्त मिळतात व तसेच जरासा ऊस मोठा होईपर्यंत ओलावा टिकून राहतो.

Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

दुष्काळ

दुष्काळानं होरपळून निघणारा शेतकरी, ओसाड पडत चाललेलं गाव. पाणी आणि चाऱ्याच्या कचाट्यात अडकडून जनावरांची होणारी फरफट. हे सगळं आपल्या अवतीभवती घडत आहे. त्यामुळे राज्यात चारा छावण्या लवकर सुरू केल्या पाहिजे.
        सरकारच्या भोंगळ कारभारामुळे जनावरांना पाजायला पाणी नाही, खाऊ घालायला चारा नाही त्यातच भरीस भर म्हणून महाराष्ट्रात  एकही चारा छावणी नाही. यामुळे लाखो जनावरांच्या जिविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे .
 यावर सरकार काही करणार का? 
की दुष्काळामुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्याला पशुधनालाही मुकावे लागणार?
  
  स्विकृती अॅग्रो क्लिनिक परिवाराकडून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की, येत्या काही दिवसांत गणेश उत्सव सुरू होत आहे सर्व मंडळांनी खर्च नियंत्रित करावा. तसेच विसर्जनासाठी मिरवणूक मध्ये डी जे वर लाखो रुपये पर्यंत खर्च करतात या वर्षी तो खर्च आपल्या विभागात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा. 
 कृपया ही संकल्पना सर्व गणेश उत्सव मंडळ यांनी अंबलात आणावी. 
   शेतकरी सेवार्थ..

Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic  https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

शेती विषयक सल्ला

#मजूर किंवा यंत्रसामग्री यांसारख्या संसाधनांचा अकार्यक्षम वापर केल्यास जास्त खर्च आणि कमी उत्पन्न मिळू शकते. तुम्ही तुमच्या उत्पादन प्रक्रियेचे नियमितपणे मूल्यमापन केले पाहिजे आणि ज्या भागात सुधारणा करता येतील हे लक्षात घेऊन अवलंब करावा. 
  
शेतकरी सेवार्थ .. 
https://bit.ly/2miyhzj

शेती विषयक सल्ला

#शेती_विषयक_सल्ला 
मी शेतकऱ्यांना नियमितपणे त्यांच्या पिकांच्या शेतांना भेट देण्यास आणि शोध घेण्यास प्रोत्साहित करतो.
#लक्षात घ्या की नियमित भेटीमुळे शेतकऱ्याला कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव लवकर ओळखता येतो आणि कीड किंवा रोग पसरण्यापूर्वी नियंत्रणाचे उपाय करता येतात.

शेतकरी सेवार्थ 

https://whatsapp.com/channel/0029VaAoBya47Xe4b9SqwU2l #swikrutiagroclinic #SwikrutiAgroClinic

फरसबी लागवड

नमस्कार शेतकरी बांधवानो,
चुका करण्यापूर्वी तांत्रिक सल्ला घेण्याची सवय लावू.
      जेव्हा तुम्ही उत्पादित रसायने वापरत असाल तेव्हा उत्पादकाच्या शिफारशी आणि तज्ञांच्या तांत्रिक सल्ल्याचे अनुसरण करा.
      अशा काही चुका असतात ज्या एकदा केल्या की सुधारता येत नाहीत.
#सूचना: खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांसारख्या उत्पादित रसायनांचा अयोग्य वापर झाल्यास पिके, प्राणी आणि लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
  म्हणून ही रसायने वापरताना खूप काळजी घ्या.
शेतीच्या जगात काय चालले आहे याबद्दल तुम्हाला अपडेट ठेवायचे आहे का? 
किंवा तुम्हाला नवीन शेतीचे तंत्र आणि नवकल्पना शिकून तुमच्या शेतीचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवायची आहेत?

सर्व शेतीविषयक सल्ला मिळवण्यासाठी,

https://www.facebook.com/SwikrutiAgroClinic?mibextid=ZbWKwL
 https://swikrutiagroclinic.blogspot.com/?m=1
 https://g.page/swikruti-agro-clinic?share
 https://www.instagram.com/swikruti.agro?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== https://t.me/swikrutiagr

शेतकरी सेवार्थ

नमस्कार शेतकरी बांधवानो,
चुका करण्यापूर्वी तांत्रिक सल्ला घेण्याची सवय लावू.
      जेव्हा तुम्ही उत्पादित रसायने वापरत असाल तेव्हा उत्पादकाच्या शिफारशी आणि तज्ञांच्या तांत्रिक सल्ल्याचे अनुसरण करा.
      अशा काही चुका असतात ज्या एकदा केल्या की सुधारता येत नाहीत.
#सूचना: खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांसारख्या उत्पादित रसायनांचा अयोग्य वापर झाल्यास पिके, प्राणी आणि लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
  म्हणून ही रसायने वापरताना खूप काळजी घ्या.
शेतीच्या जगात काय चालले आहे याबद्दल तुम्हाला अपडेट ठेवायचे आहे का? 
किंवा तुम्हाला नवीन शेतीचे तंत्र आणि नवकल्पना शिकून तुमच्या शेतीचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवायची आहेत?

सर्व शेतीविषयक सल्ला मिळवण्यासाठी,

https://www.facebook.com/SwikrutiAgroClinic?mibextid=ZbWKwL
 https://swikrutiagroclinic.blogspot.com/?m=1
 https://g.page/swikruti-agro-clinic?share
 https://www.instagram.com/swikruti.agro?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== https://t.me/swikrutiagr 

शेतकरी सेवार्थ...

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
        तुम्ही शेती सुरू करण्यापूर्वी, तुम्ही ज्या पिकाची लागवड करणार आहात त्या पिकाचा अभ्यास करा, त्याच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आणि त्यावरील सर्व संभाव्य कीड आणि रोग जाणून घ्या, तुम्ही त्यांच्याशी कसे लढा द्याल याचे नियोजन करा जेणेकरून तुम्हाला असे नुकसान होणार नाही. .
#शेतकरी_सेवार्थ..
#swikrutiagroclinic

Wednesday, April 28, 2021

उन्हाळी_हंगाम_मेथी_पिकावर_वाढीस_परिणाम

 



#उन्हाळी_#हंगाम_#मेथी_पिकावर_वाढीस_परिणाम दिसून येतो ,पाणी देताना सकाळी लवकर किंवा संध्यकाळी उशिरा द्यावे पिकामध्ये वाढीवर फोटो मध्ये आहे अशी समस्या असल्यास #रिडोमिल_गोल्ड ५० ग्राम  + #सूक्ष्म_अन्नद्रव्य ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (जास्त प्रमाणात ही समस्या असल्यास द्रावणाची आळवणी करावी )

#SwikrutiAgroClinic #SwikrutiAgro

https://bit.ly/2miyhzj



Monday, December 28, 2020

#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण :

 


#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण : 

सद्यपरिस्थितीत #ढगाळ वातावरणामुळे हिरव्या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो .

#शेतक-यांनी #पिकाचे निरीक्षण करून  किडींचा #प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोच्यावर आल्यानंतर सर्वप्रथम #वनस्पतिजन्य किंवा #जैविक  #कीटकनाशकांना #प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी #निंबोळी #अर्क ५ टक्के किंवा #ऑझंड़ीरेंक्टीन ३०० #पीपीएम ५०#मिलि. प्रति १०  #लिटर पाणी किंवा

खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून #साध्या (#नॅपसॅक) #पंपाने #फवारणी करावी. 

#पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे #प्रमाण #तिप्पट करावे. 

#आवश्यकता भासल्यास #दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.


१) #क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं.


२) #इमामेक्टिन #बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम


३) #डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि. 


४) #लॅमडा #साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रवाही १० मिलेि.


५) #क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३  मिली      

    

अधिक माहिती साठी संपर्क

📲*https://bit.ly/2miyhzj*


#स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक #swikrutiagro #swikrutiagroclinic #agro #agri #agriculture  #agriculturelife #agribusiness #agricultural

Sunday, November 22, 2020

#मिरची_लागवड



 #मिरची_लागवड :-

-मिरची हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे ,सध्यपरिस्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक घेतले जाते, मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे.

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन :-

खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी.

मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हिरव्या मिरचीसाठी ज्वाला, एन. पी. - 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी. उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. - 46 या जातींची निवड करावी. रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी.इतर लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाणाची निवड करावी )

-एकरी बियाणे ४०० ते ६०० ग्राम 

-लागवडीसाठी अंतर उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड ६० बाय ४५  सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५  सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी.

- रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १०  लिटर पाण्‍यात २० मिली क्लोरोपायरीफॉस + २५  ग्रॅम एम ४५  +३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक ८० टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार १८:४६:०० -१०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो + कोसावेट ३ किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो + युरिया १.५ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५ फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने काढणीपर्यंत करावी.

-२५व्या दिवशी अलिका १० मिली + स्कोर ८ मिली /१५ लिटर

-विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २५ ते ५० दिवस )

-३२व्या दिवशी कोसावेट ३ किलो + मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून द्यावे.

-४० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(१२:६१:०० बरोबर देऊ नये )

-४५ दिवशी ट्रॅकोडर्मा ठिबकमधुन सोडावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:४०:१३ -४ किलो किंवा  (१२:६१:०० २ किलो + १३:००:४५ -२ किलो ) ४ दिवसाच्या अंतराने आवश्यकते प्रमाणे द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५० ते ११० दिवस )

-५५ व्या व ६५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्राम / १५ लिटर 

- ५५ ते ६० दिवसादरम्यान झाडांना मातीची भर देऊन घ्यावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-आवश्यक फवारणी मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर  कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम + बोरॉन १ ग्राम प्रति लिटर  १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी 

-७२ व्या दिवशी ओबेरोन १५ मिली /१५ लिटर

-८५  दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(विद्राव्य खताबरोबर देऊ नये )

-वातावरणातील रोग व किडी सध्यपरिस्थितीनुसार फवारणी घ्यावी

#काढणी_व_उत्पादन :-

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्या फळांची तोडणी देठासह ८ ते १० दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे १० ते १२ तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे एकरी ३२ ते ४०  क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन एकरी  ३,५  ते ४ क्विंटल निघते.

#मिरची_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खतव्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #chilli_planting   

 #swikrutiagroclinic 


Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https: /t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6 

 📞 https://bit.ly/2miyhzj

                                   धन्यवाद !

Tuesday, November 10, 2020

#टोमॅटो_लागवड




 #टोमॅटो_लागवड :- 

-टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिके आहे ,महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी टोमॅटो पीक घेता येते ,सद्यपरिस्थिती नाशिक ,पुणे,सातारा ,सांगली , नागपूर ,चंद्रपूर ,अहमदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. 

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन  :- खरीप जून -जुलै , रब्बी सप्टेंबर - ऑक्टोबर ,उन्हाळी डिसेंबर -जानेवारी.

टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.

#लागवडीसाठी_सुधारित_वाण :-पुसा गौरव ,रोमा ,अर्का विकास,फुले राजा ,पुसा रुबी,पंजाब केसरी, नामधारी २५३५.अभिनव,अविनाश,आयुष्यमान  २ ,रुपाली ,वैशाली ,इ लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार जातीची निवड करावी ) 

- एकरी बियाणे १०० ते १२० ग्राम 

- लागवडीसाठी अंतर खरीप व रब्बी ९० बाय ६० सेमी उन्हाळी ६० बाय ४५ सेमी .

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार युरिया १५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट ३५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा या वेळेस ठिबकमधून सुडोमोनास द्यावे.रोप लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + साफ / मेटको ५०० ग्राम + ह्यूमिक ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५   फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

- ३० ते ३५ दिवसादरम्यान झाडाला वळण व आधार देणे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १२:६१:०० ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ३१ ते ५० दिवस )

- ३५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने २ वेळेस द्यावे.

- ४५ व्या दिवशी ठिबकमधून  मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो (१२:६१:०० सोबत देऊ नये ) 

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:००:४५  ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ५० ते ७० दिवस )

- ५० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक पॉवर ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-   पुढील तोडणीला १२:६१:०० २ किलो + १३:००:४५ २ किलो या प्रमाणात विद्राव्य खते चालू ठेवावी 

#उत्पादन :- जातीपरत्वे एकरी सरासरी उत्पादन ३० ते ४५ क्विंटल येते तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस आधी कीटकनाशक फवारणी करू नये ,६५ ते ७० दिवसांनी तोडणी सुरु होते.तोडणी दिवसाआड करावी.

#टोमॅटो_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #Tomato_planting   #उत्पादन  #swikrutiagroclinic 

 Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://bit.ly/2miyhzj

Friday, November 6, 2020




 #कलिंगड_लागवड :-


#लागवडीचा_कालावधी_व_जमीन :-

उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. कडक उन्हाळयाचा व भर पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते.

 वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

 - दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो 

- या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.

#जाती :-

शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, किरण १, किरण २, पूनम, ऑगस्टा या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० -४०० ग्रॅम बियाणे लागते.

#रोपवाटिका :-

- लागवडीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी पेरून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे.सुमारे ८ – १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते.रोपे उगवून आल्यानंतर ३ -४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत.

- मर होऊ नये म्हणून दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड  दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी 

- साधारणतः १६ ते १८ दिवसांनी पुनर्लागवड करावी.

#खत_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार ,१८:४६:०० -५० किलो ,पोटॅश ५० किलो ,कोसावेट ३ किलो ,फोलिडोल ५ किलोएकरी द्यावे.

- गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी  मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे ४ ते ५ रोल लागतात.रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० से.मी. अंतरावर १० से.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे. 

- आवश्यक फवारणी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून लागवडीपासून काढणीपर्यंत २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने  ७ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते २५दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १५ व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २० ते ३५ दिवस )

- २५ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

- ३० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

-३५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून ००:५२:३४- ३ किलो - ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ३६ ते ५० दिवस ) 

- ५१ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून किलो १३:००:४५ -३ किलो ३  दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५१  ते ६५ दिवस ) 

- ६५ व्या दिवशी पोटॅशिअम सोनाईट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

#रोग_व_किडी_व्यवस्थापन :-

 - केवडा / मर - मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ,भुरी - डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल.

-फळमाशी - कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. क्यूल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. पिकावर व जमिनीवर मॅलॅथीऑनची ०.१ % फवारणी करावी. रसशोषणाऱ्या किडी - इमिडाक्लोप्रिड (१८.५ एस.सी.). किंवा फिप्रोनील (५ ई.सी.) बुरशीनाशक व कीटकनाशक आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

#काढणी_व_उत्पादन:

- फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात.

- फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असाआवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असाआवाज येतो.कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते.

- साधारणपणे बियाणे लागवडीपासून  ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.

- साधारणतः जातीनिहाय एकरी ३० ते ४९ टन उत्पादन मिळते.


#मार्गदर्शक_Swikruti_Agro

  

Swikruti Agro Clinic

 

#swikrutiagro #swikrutiagroclinic   #watermelon_planting   #swikruti_agro #watermelon #कलिंगड #टरबूज


 https://www.facebook.com/swikrutiagroclinic/


📞   https://bit.ly/2miyhzj

Sunday, November 1, 2020

#काकडी_लागवड


 #काकडी_लागवड 
#लागवड_कालावधी_व_जमीन : काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून - जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.जमीन थोडी रेतीयुक्त असेल तर पिक चांगले येते.
#जाती - लागवडीसाठी फुले हेमांगी, फुले शुभांगी, जपान लॉंग ग्रीन, बलराम खीरा, प्रिय हे सुधारित वाण आहेत.
#खत_व्यवस्थापन : पूर्व मशागत करताना एकरी आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.काकडी पिकाकरिता जमिनीतुन द्यावयाचे रासायनिक खत प्रमाण एकरी  (शिफारस) ४५ किलो युरिया,१२० किलो सुपर फाँस्फेट,३० किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.
-काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे एकरी अर्धा किलो बियाणे लागते.
-लागवडीनंतर एकरी  ७ व्या दिवशी साफ ५०० ग्राम + अक्टरा २५० मिली+ ह्यूमिक ५०० ग्राम आळवणी करावी १० व्या दिवसानंतर १९:१९:१९ - ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे ३० व्या दिवसानंतर १२:६१:०० -३ किलो ३ वेळा द्यावे.आवश्यक खतमात्रा  कॅल्शिअम नायट्रेट २ किलो + बोरॉन २० टक्के ५०० ग्राम(१२:६१:००  ह्या विद्राव्य खतांसोबत देऊ नये ) ठिबकमधून १५ दिवसाच्या अंतराने २ वेळेस  द्यावे. ४० व्या दिवसापासून १२:६१:०० २ किलो +१३:००:४५ -२ किलो ५ वेळेस द्यावे  तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
#रोग_व_किडी : - रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे. फळमाशी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नुवोन २० मिली + गूळ ५० ग्राम १५ लीटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.गुळाकडे फळमाशी आकर्षित होऊन नियंत्रण लवकर होण्यास मदत होते.प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केवडा, भुरी या बुरशी जन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार  फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता बदलून बदलून फवारावे. 
-सुमारे दीड महिन्याने काकड्या तोडणीस येतात अंदाजे १२ ते १५ तोडण्या होतात.
#उत्पादन :- एकरी सात ते दहा टन होते . 
-संकरीत काकडीचे वजन २०० ते २५० ग्रॅम भरते तर एकरी उत्पादन १२ ते १५ टन पर्यंत मिळते.
#काकडी_लागवड #फळमाशी.#रोग_व_किडी #खत_व्यवस्थापन #लागवड_कालावधी_व_जमीन  #उत्पादन  #cucumber_planting 
#swikrutiagroclinic 

Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

📞https://bit.ly/2miyhzj

Thursday, October 29, 2020

#सेंद्रिय_शेती

सेंद्रिय_शेतीच्या नावाखाली कंपनी प्रतिनिधी साखळी विपणन पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहचवत असतात. 

सदर फोटो ( या सारख्या सेंद्रिय  विविध कंपनी आहेत )  मध्ये रोप व  दिवस यांची पडताळणी करावी . 

संदर्भासाठी खालील माहिती पडताळणी करा. 


https://m.facebook.com/story.php?story_fbid=2730979833661426&id=2170549573037791



Wednesday, October 28, 2020

#shetkari

 काळ्या मातीत बियाणे टाकून आस्मानी आणि सुलतानी संकटाचं चँलेंज स्वीकारायला शेतकऱ्यांचं काळीज असावं लागत!


#ओला_दुष्काळ 

#शेतकरी_वाचवा

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

#swikrutiagro #swikrutiagroclinic #Onion 



📱https://bit.ly/2miyhzj

Monday, October 26, 2020

#बटाट्याचे #एकरी #१८ #टन #उत्पादन

आधुनिक पद्धतीने शेती करीत बटाट्याचे एकरी १७ ते १८ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन तंत्रशुद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग करून खोडद येथील अंगराज कुचिक यांनी भरघोस पीक घेतले आहे. हा आधुनिक यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकरी बटाटा लागवडीकडे वळू लागले आहेत. एकरी १९ ते २० टन उत्पादन मिळवण्याचे कूचिक यांचे उद्दिष्ट होते.

हंगाम लागवडीची वेळ / काढणीची वेळ
खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा
सप्टेंबर-ऑक्टोबर
रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा -- फेब्रुवारी-मार्च
पुणे- नारायणगाव खोडद येथील प्रगतशील शेतकरी अंगराज कुचीक कुटुंबाचा वारसा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करत एकरी १८ टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कुचिक यांची नारायणगावपासून १० किलोमीटर अंतरावर खोडद येथे शेती आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत एकच एक पीक घेत नाहीत. गवार, कोबी, बीट, कांदा, ऊस अशी विविध पिके घेतात.
त्यांच्या आजूबाजूला ऊस शेती असतानाही ते केवळ ऊस लागवड करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्षभर वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन घेतात.
बटाटा लागवडीविषयी कूचीक सांगतात की, लागवडीपासून काढणीपर्यंत अतिशय नियोजनबद्ध लक्ष दिले. यासाठी जमीन कोळपून घेऊन भुसभुशीत केली. त्यानंतर पुन्हा एकदा आलटून-पालटून घेतली.
जमीन भुसभुशीत केल्यामुळे बटाट्याची मुळे खोलपर्यंत जाण्यास मदत होते. बटाट्याची मुळे साधारणत: ३० ते ३५ सेंटिमीटपर्यंत खोल जातात. त्यामुळे बटाट्याची वाढ चांगली होऊन तो पोसण्यासाठी खोल नांगरट फायदेशीर ठरते.
१०:२६:००-१०० किलो + युरिया ५० किलो +पोटॅश ५० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो या प्रमाणात खत मात्रा दिली. सहा इंच खोलीवर दोन बटाट्यांत नऊ ते दहा इंच व दोन ओळींत १५ इंच अंतर ठेवून लागवड केली. प्रमाणबद्ध पाण्याचे नियोजन केले दिवसाआड पाणी दिल्याने खताचे प्रमाण कमी लागले.
पिकांच्या संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी केली.लागवड करताना ती यांत्रिक पद्धतीने न करता मजूर लावूनच करून घेतली. लागवडीनंतर तण वाढू नये, यासाठी साधारणत: आठवडाभरात तणनाशक फवारले. व हलकीशी खुरपणी केली
त्यानंतर महिनाभराने एकरी ५ किलो कॅल्शिअम नायट्रेट व १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले. तसेच २० ते ४५ दिवसांच्या दरम्यान विद्राव्य खताची मात्रा दिली कोणतेही पीक घेताना पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते.
पिकाला वेळेवर आणि योग्य तेवढे पाणी मिळाले पाहिजे ज्या दिवशी ढगाळ हवामान असेल, त्या दिवशी तर पाणी देणे बंद ठेवले. या काळात पाणी बंद न ठेवल्यास ‘उशिराचा करपा’ येण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्यास एकदम जास्त पाणी देणे फायद्याचे ठरते. त्यानंतर तीन-चार दिवस पाणी ठेवा. यामुळे करपा रोगाला दूर ठेवता येते. पोषक हवामान असतानाही पाण्याचे योग्य नियंत्रण केले, तर करपा रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पीक स्वत:च त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनते.
- संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. सर्वसाधारणपणे पीक ३० दिवसांचे झाल्यावर पहिली, ४५ दिवसांचे झाल्यावर दुसरी व ५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली.
५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली,
-बटाटा पीक साधारणत: तीन ते साडतीन महिन्यांत काढणीस येते.
- काढणीआधी १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद केले. याचा फायदा असा झाला की, बटाट्याची साल परिपक्व होण्यास मदत झाली आणि ओलसरपणाही कमी झाला. काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाची कापणी करून जमीन साफ केली. त्यानंतर लाकडी बळीराम घालून काढणी केली.

मार्गदर्शन - स्वीकृती आग्रो क्लिनिक













Thursday, November 14, 2019

https://www.facebook.com/swikrutiagroclinic

नमस्कार,शेतकरी बांधव आपल्या शेतीतील अनुभवातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी छोडासा प्रयत्न!

https://www.facebook.com/swikrutiagroclinic
@swikruti