#रब्बी_ज्वारी:-
बियाणे व बीजप्रक्रिया:-
रब्बी ज्वारी सुधारित वाण -
१) हलकी जमीन (खो ३० सेमी ) -फुले अनुराधा,फुले माऊली २) मध्यम जमीन (खो ६० सेमी ) - परभणी मोती, मलदांडी ४५ ,फुले सुचित्रा ,फुले माऊली
३) भारी जमीन ( खो ६० सेमी पेक्षा जास्त )- फुले वसुधा ,फुले यशोदा
४) बागायातीसाठी- फुले रेवती फुले वसुधा
५) हुर्ड्यासाठी - फुले उत्तरा, फुले मधुर
६)लाह्यासाठी - फुले पंचमी
७) पापडासाठी - फुले रोहिणी
#बियाणांचे_प्रमाण_आणि_बीजप्रक्रिया :
हेक्टरी १० किलो बियाणांची शिफारस आहे. घरचे बियाणे वापरताना काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी ३०० मेश गंधक ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आणि पेरणी उशिरा झाल्यास खोडमाशीच्या नियंत्रणासाठी....थायोमेथोक्झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी.
चाऱ्यासाठी ज्वारी लागवड करताना एकरी १६ किलो बियाणे दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवून दाट पेरावे.
रासायनिक खताचा वापर :
जिरायती रब्बी ज्वारीसाठी हेक्टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणी बरोबरच तर ओलिताखालील रब्बी ज्वारीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश वापरावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी....पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.खत आणि बियाणे खोल १२ सेंमीपर्यंत पेरून दिल्यास ओलाव्याचा कार्यक्षम वापर होतो. पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र हेक्टरी दिल्यास सुद्धा चांगला फायदा होतो.
अधिक माहितीसाठी संपर्क
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #रब्बी_ज्वारी https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
No comments:
Post a Comment