Tuesday, February 6, 2024

कापूस आकस्मित मर

#कापूस 
#आकस्मिक_मर_रोग

लक्षणे :–
पावसाचा पडलेला खंड त्यानंतर चार पाच दिवसांनी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास किंवा दिवसाचे तापमान ३८ सें.पेक्षा जास्त दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. 
पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. 
झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पाने निस्तेज होतात.
पाने पिवळी पडतात.
 पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.

उपाययोजना:-
• वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये.
• पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. 
• विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच २४ तासाच्या आत यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी ब्ल्यू कॉपर ५०० ग्रॅम किंवा  एम ४५ ५०० ग्रॅम +  युरिया १.५ किलो +  पालाश १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोजल काढून आळवणी / ड्रेंचींग करावी प्रती झाडास १५० ते २०० मि.लि. द्यावे यासाठी पायाचा अंगठा व पायाचे पहिले बोट यामध्ये झाडाचे बूड पकडून पायाने झाडाच्या बुडाजवळची माती मोकळी करून झाडाला थोडा तिरपा बाक द्यावा. त्यानंतर आळवणी केल्यास जास्त फायदेशीर सिद्ध होते. तसेच झाडाला बुडाशी दोन्ही बाजूने पायाने दाबावे. 
• त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी (१८/४६/००) १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
           शेतकरी सेवार्ध.. 
अधिक माहितीसाठी संपर्क
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #कापुस https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📞 https://bit.ly/2miyhzj

No comments:

Post a Comment