#वाटाणा_लागवड
वाटाणा लागवड हे रब्बी हंगामात पश्चीम व उत्तर महाराष्ट्रात वाटाणा हे पिक चांगलेच महत्वाचे आहे.वाटणा या पिकांची सातारा, नाशिक, बडोदे, अहमदनगर, खानदेश, पुणे या सारख्या ठिकाणी लागवड अधिक केली जाते.
वाटाणा या पिकाला हॉटेलमध्ये चांगल्याप्रकारे मागणी आहे. वाटणा लागवड पीक जमिनीच्या आतमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करत असते, यामुळे होते हे कि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
#जमीन_व_हवामान :-
रब्बी हंगाम वाटणा लागवड या पिकाला जास्त फायदा होतो. पीक वाढीसाठी अंदाजे दर महिन्याचे सरासरी तापमान १० ते २२ अंश से. असावे. वाटाण्याच्या बिया उगवण्याकरिता २२ अंश से. तापमान हे अनुकूल तापमान आहे. वाटाणाच्या पिकाच्या लागवडीसाठी सुपीक, मध्यम ,पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ इतका असावा.लागवडपुर्व मशागतीला या पिकात खूप महत्त्व आहे. त्यासाठी जमिनीची एकवेळा नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुशीत करून लागवड करावी.
#वाटाणा_अधिक उत्पादनासाठी सुधारित जाती जी एस १० ,इडम ग्रीनवुड ,सलोनी, ए पी ३, नुजिविडू केरोल,
नामधारी एन एस ११००, या जातीची पेरणी करू शकता.
#वाटाणा_लागवड पिकाची वर्षातून दोन हंगामांत लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात करावी. लागवडीसाठी सपाट वाफे किंवा सरी -वरंबे या पद्धतीचा अवलंब करता येतो. सपाट वाफ्यात ६० सें.मी.x ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. सरी वरंब्यावर लागवड करावयाची असल्यास ६० सें.मी. अंतरावर सऱ्या सोडाव्यात. सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने किंवा पाभरीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने लागवड केल्यास रोपांमधील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे. टोकण पद्धतीने एकरी ८ ते १० किलो लागते.पेरणी पद्धतीने २० ते २५ किलो एकरी लागते.
#खत_व्यवस्थापन :-
१२/३२/१६ - ५० किलो किंवा १५/१५/१५ - ५० किलो किंवा १४/२८/१४ - ५० किलो + गंधक १० किलो पेरणी करताना एकरी द्यावे .
#रोग_किडी_व्यवस्थापन :-
- १५ व्या दिवशी पाण्यातून ह्युमिक ५०० ग्रॅम +साफ ५०० ग्रॅम + १९/१९/१९ ५ किलो एकरी पाण्यातून द्यावे.
- १७ व्या दिवशी रोगर -६० मिली + एम ४५ - ६० ग्रॅम + हमला ५०५ - ५० मिली २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- २१ व्या दिवशी खुरपणी किंवा तणनाशक परा सूट ( imazathapyr 10% sl ) मारावे
- २५ व्या दिवशी २४/२४/०० ५० किलो द्यावे गंधक पावडर धुरळणी करावी.
- २७ व्या दिवशी अंट्राकॉल ५० ग्रॅम + प्रोफेक्स सुपर ५० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ३२ व्या दिवशी टाटा बहार ४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पुन्हा ही फवारणी ६ व्या दिवशी घ्यावी.
- ४५ व्या दिवशी पाण्यातून सल्फर ९० % ३ किलो + युरिया १किलो पाण्यातून द्यावे.
गरज पडल्यास अळी व भुरी साठी फवारणी करावी सल्फर ४० ग्रॅम + एकलक्स ४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० ग्रॅम २० लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी.
_५५ ते ६० व्या दिवशी तोडणी सुरू करावी.
#पाणी_व्यवस्थापन :-
वाटणा पिकाला इतर भाजीपाल्यांप्रमाणे पाणी लागत नाही वाटणा या पिकाला कमी पाणी लागते. वाटणा लागवड नंतर या पिकाला हलके पाणी द्यावे लागते. पाण्याची दुसरी पाळी हि फुल धरण्याच्या काळात आणि तिसरी शेंगामध्ये दाने भारत असताना द्यावी लागते. जमीन वाळूमिश्रित आणि हलकी असल्यास याला नियीमित पाणी द्यावे.
#काढणी_व_उत्पादन :-
वाटाणा हे पिक कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ६५ दिवसात काढणी करावी.
या शेंगाचा गडद आणि हिरवा रंग बदलून त्याला फिक्कट व हिरव्या रंगाच्या आणि टपोऱ्या दिसू लागतात. काढणी ३ ते ४तोड्यात पूर्ण होऊन जाते.
वाटणा हे पिक लवकर येणाऱ्या जातीचे असून हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन हे सरासरी १५ ते १८ क्विंटल आणि मध्यम कालावधी मध्ये तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन अंदाजे २५ ते ३० क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे साधारणता ३० ते ४० क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते.
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
No comments:
Post a Comment