दुष्काळानं होरपळून निघणारा शेतकरी, ओसाड पडत चाललेलं गाव. पाणी आणि चाऱ्याच्या कचाट्यात अडकडून जनावरांची होणारी फरफट. हे सगळं आपल्या अवतीभवती घडत आहे. त्यामुळे राज्यात चारा छावण्या लवकर सुरू केल्या पाहिजे.
सरकारच्या भोंगळ कारभारामुळे जनावरांना पाजायला पाणी नाही, खाऊ घालायला चारा नाही त्यातच भरीस भर म्हणून महाराष्ट्रात एकही चारा छावणी नाही. यामुळे लाखो जनावरांच्या जिविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे .
यावर सरकार काही करणार का?
की दुष्काळामुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्याला पशुधनालाही मुकावे लागणार?
स्विकृती अॅग्रो क्लिनिक परिवाराकडून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की, येत्या काही दिवसांत गणेश उत्सव सुरू होत आहे सर्व मंडळांनी खर्च नियंत्रित करावा. तसेच विसर्जनासाठी मिरवणूक मध्ये डी जे वर लाखो रुपये पर्यंत खर्च करतात या वर्षी तो खर्च आपल्या विभागात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा.
कृपया ही संकल्पना सर्व गणेश उत्सव मंडळ यांनी अंबलात आणावी.
शेतकरी सेवार्थ..
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
No comments:
Post a Comment