#मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे. त्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 20 मे हा दिवस साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 ला मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार 20 मे हा दिवस 'जागतिकमधमाशीदिन' म्हणून घोषित करण्यात आला.
आपण करत असलेल्या बदलांमुळे, वापरत असलेल्या कीटकनाशकांमुळे मधमाशा संकटात आहेत. त्यातच एक पीक पद्धती आणि पाण्याची टंचाई हेही एक महत्त्वाचं कारण आहे.. . . . . .. आज जागतिक मधमाशी दिवस २० मे आहे. त्यानिमित्त आपण या छोट्या पण आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक जीवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या वागण्यात काही बदल करूया.
🔸मधुमक्षिका पालन ,स्वतः करणे ,
🔸शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ,
🔸मध व उपपदार्थ संकलन प्रोजेक्ट मध्ये
गुंतवणूक करणे
🔸मध पेटी ,निर्मिती व भाडेतत्त्वावर देणे
अशी संधी आहे.
शेतकऱ्यांना या मध्ये फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे
✨दर्जेदार पीक व फळ उपलब्धता
✨गुंतवणुकीपासून आर्थिक फायदा
४० प्रकारचे व्यवसाय उपलब्ध
✨औषधी उपयोगासाठी विक्री ची संधी
१९ प्रकारचे औषधी मध मिळतात
.🐝 मधमाशी 🐝 केवळ एक जीव नसून
आपली तारणहार आणि आर्थिक स्थिती सुधारू शकणारी मित्रजीव आहे हे लक्षात ठेवूया
आणि तिच्या मदतीने आयुष्य # अर्थपूर्ण 💰 करूया 😍
Pic@tumblr
💠थेंबे थेंबे तळे साचे 💧💧
#जगतिकमधमाशीदिन
No comments:
Post a Comment