#सोयाबीन_अधिक उत्पादनासाठी सुधारित जाती 🌱🌱🌱*सोयाबीन बियाणे*🌱🌱🌱
*के डी एस फुले संगम ७२६, फुले किमया ७५३, फुले दुर्वा ९९२,३३४४जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३,फुले अग्रणी (केडीएस ३४४) या जातीची पेरणी करू शकता.
#लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते.पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. तर दोन रोपातील अंतर १० सेमी असावे.सोयाबीनचे एकरी २८_३० किलो बियाणे लागते . सोयाबीन उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
#खत_व्यवस्थापन १२/३२/१६ ५० किलो + गंधक १० किलो किंवा २०/२०/००/१३ ५० किलो एकरी द्यावे सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.
#अंतरपीक -तूर + सोयाबीन , कापूस + सोयाबीन .
#रोग_किडी व्यवस्थापन
लागवडीनंतर १० – १५ दिवसांत १९:१९:१९ -१०० ग्राम + सूक्ष्म अन्नदरव्य २५ ग्राम .१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पेरणीनंतर तणनियंत्रणासाठी १५ ते २१ दिवसादरम्यान शकेद ८०० मिली प्रति एकर फवारावे ( ७ लिटर पाणी + ८०० मिली शकेद + ३०० ग्राम बॉस्ट (सोबत पॅकिंग मध्ये असते ) एकत्र चांगले मिसळून फवारणी पंप किती होतात त्या सम प्रमाणतात मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणी केल्यानंतर साधारण पाने पिवळी पडतात त्यावर ५ व्या दिवशी युरिया ३० ग्राम +फेरस सल्फेट ५० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलोरा अवस्थेत -२० टक्के बोरॉन-१५ ग्राम + टाटा बहार ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
शेंगा पासत असतांना -००:५२:३४- १५० ग्राम + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
रोग व किडी -पाने खाणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या आळ्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कराटे २० मिली /हमला ५५० -३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी .
रोग -प्रतिबंधत्म्क पहिली फवारणी कॉनटॉफ प्लस ४० मिली /१५ लिटरपाणी दुसरी फवारणी अंतराकॉ ल ४० ग्राम /१५ लिटर पाणी
सोयाबीन ची काढणी ९५ टक्के पाने गळुन शेंगा तपकिरी रंगाची झाल्यावर करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क..
Swikruti Agro Clinic
#swikrutiagro #swikrutiagroclinic #सोयाबीन https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
No comments:
Post a Comment