Tuesday, February 6, 2024

धुक्यात कांदा पीक

#धुक्यात_कांदा पिकाची काळजी अशी घ्यावी.??
   __कांदा पिकाचे शेंडे पिवळे होण्यास सुरुवात होते. 
 __ कांद्याची पात झुकलेले दिसतात.
 __ धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.
कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान १० ते १२ दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. 

हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव  साठलेले असते ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याचे फवारणी करू शकता.त्यामुळेपातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.दुसरा उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

 धुके ज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये. तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता.

 ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर  किंवा रेन पाइप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.

 - कांदा पिकाला रोजच्यारोज फवारणीची आवश्‍यकता नसते. मात्र रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसातून एकदा बुरशीनाशक अधिक  सिलिकॉन फवारणी करावी. शक्यतो द्रव स्वरूपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.

_ सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे.
शेतकरी सेवार्थ ..
स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक 🌾
https://instagram.com/swikruti.agro
https://swikrutiagroclinic.blogspot.com/
https://www.youtube.com/channel/UCTza8UL6zkqih2d75ZWm-FA
https://g.co/kgs/u4P4bV
https://t.me/swikruti
📲   https://bit.ly/2miyhzj

No comments:

Post a Comment