सध्या #जुन्नर , #आंबेगाव , #मावळ या भागातील पीक पाहणी करत असताना असे निदर्शनात आले की शेतकरी वर्ग आधुनिक पद्धतीने शेती करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत.
#सोशल_मीडियचा वापर करून शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. #कोरोना महामारीत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना भेटत नाही. अवकाळी पावसासोबत बाजारभाव व मालाची गुणवत्ता या कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
#कृषी_क्षेत्रात बदल होणे अपेक्षित आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार शेतीमालाच्या उत्पादनाकडे वळणे. बहुतांश शेतकरी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्याप्रमाणे स्वतः ला आवडेल त्या पिकाचे उत्पादन घेतात, त्यामुळे बाजारात एकाच वेळी मालाचे #बाजारभाव कोसळतात.
#सोशलमीडिया वर नवीन एखादे मॉडेल आले आहे ते म्हणजे #जिरेनियम_शेती.
_ जिरेनियम शेती सदर उत्पादन मार्केट मध्ये उपलब्ध आहे का ?
_ उत्पादनास मागणी आहे का ?
_ शेतीचे अर्थशास्त्र ते आधी सांगतात यामध्ये तुम्हाला ठराविक गुंतवणूक करावी लागते का ?
_आपण पैसे गुंतवणूक करून आपल्याला त्यामागील मिळणारे उत्पादन लाखो मध्ये सांगितले जाते खरच लाखो मध्ये उत्पादन मिळणे शक्य होते का ?
_ होत असेल तर ती ठराविक कंपनी स्वतः उत्पादक का घेऊ शकत नाही ?
या सर्व प्रश्नांचा अभ्यास शेतकरी बांधवांनी करावा.
अशा मॉडेलमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे .
सदर असे मॉडेल चालवणारे कंपनी मालक हे लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे नातेवाईक असतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही. महोगनी, कोरफट, अमेरिकन केशर, कडकनाथ,शतावरी,अश्वगंधा,व्हरटीकल फार्मिंग अशा विविध कंपनी मार्केटिंग ने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
#स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक परिवाराकडून विनंती आहे की,
आपल्या भागातील बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीमध्ये उत्पादन घ्यावे.
अशा कोणत्या ही मॉडेलच्या आहारी जाऊ नये.
#शेतकरी सेवार्थ...
अधिक माहितीसाठी संपर्क..
#swikrutiagro #swikrutiagroclinic https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
📲 https://bit.ly/2miyhzj
#𝕾𝖜𝖎𝖐𝖗𝖚𝖙𝖎𝕬𝖌𝖗𝖔𝕮𝖑𝖎𝖓𝖎𝖈
No comments:
Post a Comment