फळांची गळ ही नैसर्गिक परिस्थिती, पाण्याची कमतरता,अन्नद्रव्य कमतरता,संजीवकांचा अभाव , रोग व किडीं प्रादुर्भाव या कारणामुळे होते.
#नैसर्गिक_फळगळ:
- बहरामध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्ण तापमानात एकदम वाढ होऊन फळे गळतात, या कालावधीत दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असल्यामुळे नैसर्गिकरीत्या फळगळ होते.
#वातावरणाचा_परिणाम:
- तापमान, आर्द्रता आणि वारा या बाबी फळगळतीस कारणीभूत ठरतात. एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे हवेतील आर्द्रतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बहराच्या फळांची गळ होते.
#अनियमित_पाणीपुरवठा:
-फळधारण झाल्यानंतर पाण्याचे कमी जास्त प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाल्यास फळगळ होते .
-बागेत पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते.
#रोग_व_किडी_प्रादुर्भाव :
-रोग व किडी प्रादुर्भाव झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात फळगळ होते
- बुरशीची फुलांच्या बीजांडावर लागण होऊन फळांची गळ होते.
#सूक्ष्म_अन्नद्रव्य_कमतरता:
-जमिनीत चुना आणि जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणावर फळगळ होते
- झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळगळीमुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
#संत्रा_फळगळ_नियत्रंण_उपाययोजना:
१)खताचे व्यवस्थापन झाडाचे वय,वाढ शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे,युरियाची मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी .
२)पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी झाडास द्यावे ठिबक सिचन असल्यास फायदेशीर ठरते.
३)पावसाळ्यात बागेत पाणी साचू देऊ नये,पाणी साचत असल्यास चर खणून पाणी काढून द्यावे.
४)किडी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशक + गूळ मिसळून फवारणी करावी.खराब झालेली फळे काढून नष्ट करावी.
५)फळधारणा अवस्थेत असताना फळगळ नियंत्रणासाठी जिबरॅलिक असिड १.५ ग्राम + बाविस्टीन १०० ग्राम +युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फळधारणेपासून ते फळकाढणी अगोदर १० दिवस १ महिन्याच्या अंतराने फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

No comments:
Post a Comment