Monday, May 27, 2019

 


एक कष्टकरी कुटुंब मुलं-बाळांसहित दिवसभर उन्हात दगडांची तवे अनवाणी पायांनी तुडवत हा रानमेवा शोधत-जमा करत वन-वन फिरत राहतात. यांच्या घरची चूल सांच्याला कधी पेटते तर कधी नाही, म्हणजे पोटाला बसलेला हा भुकेचा चिमटा कधी सुटतो तर कधी नाही. तरी ओशाळला चेहऱ्यावर आनंदाचे खोटे ढग पांघरून हे कुटुंब रोज हि मेहनत सुरूच ठेवतो.
दिवसभर जमवलेला हा रानमेवा (करवंद) घेऊन घरचा धनी गावातल्या एकुलत्या एक लाल परीतून पहाटेच तालुका गाठतो. सकाळी सकाळी शाळेत जाणाऱ्या लेकरांच्या गर्दीत तो आपल्या लेकरांची चेहरे पाहत असतो. ते क्षणिक सुख अनुभवत असतानाच त्याच्या फाटक्या सदऱ्यातून जाणारा थंड वारा त्याला त्याच्या फाटक्या नशिबाची आठवण करून देत त्या स्वप्नीक दुनियेतून वास्तविकतेच्या काट्यात आणून सोडतो. कधी तरी हि परिस्थिती नक्कीच बदलेल अशी मनाची समजूत घालत आपल्या लेकरांना उज्वल भविष्य देण्यासाठी त्याचे सर्व वेडे प्रयत्न तो करत राहतो.
आपल्या अवती-भोवती पण आपल्याला असेच बरेच माय-बाप काहीनाकाही विकताना दिसली असतील! कधी आपल्याला गरज नसतानाही काही गोष्टी त्यांच्याकडून खरेदी करून त्यांच्या या वेड्या प्रयत्नांना साथ देऊन त्यांच्या दुःखाचे नाही तर नाही पण सुखाचे तरी प्रमाण होऊया.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
https://wa.me/917769090592
https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
https://www.instagram.com/swikruti.agro

Thursday, May 23, 2019

 
#कॅल्शियमची_कमतरता क्वचितच आढळते आणि बहुधा वालुकामय जमिनीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत दिसते.
  •  झपाट्याने वाढणार्‍या भागात लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
  • नविन कोंब किंवा फांद्या नीट वाढत नाहीत
  • नवी पाने निस्तेज, गोळा झालेली असतात आणि कदाचित ओबड धोबडपणे पसरलेले पिवळे चट्टे देठ आणि पानांच्या करपलेल्या कडांवर दिसतात.
  • झाडांची मुळे असमाधानकारकपणे वाढतात, फांद्या कमी येऊन झाड एकशिडी दिसते आणि वाढ खुंटलेली असते.
  • फुले ओंझत नाहीत, फळे सामान्यतः पूर्णपणे विकसित होत नाहीत किंवा बुडाला कुजल्यासारखी लक्षणे दर्शवू शकतात.
  •  लक्षणे मुख्यत: झपाट्याने वाढणार्‍या पेशीत जसे नविन कोंब आणि पालवीत दिसतात. नविन फांद्या नीट वाढत नाहीत आणि काही काळाने त्यांची संख्याही कमी होते. सुरवातीला नविन आणि मध्यम वयस्कर पानांच्या भागांवर कदाचित ओबड धोबडपणे पसरलेले पिवळे चट्टे दिसतात. जर दुरुस्ती केली गेली नाही तर ती खालच्या बाजुला किंवा वरच्या बाजुला गोळा होतात आणि त्यांच्या कडांवर हळु हळु करपट चट्टे निर्माण होतात. प्रौढ आणि जुन्या पानांवर बहुधा काहीही परिणाम होत नाही. मुळे नीट वाढत नाहीत आणि झाडात मरगळ दिसते आणि वाढही खुंटलेली असते. खूपच जास्त कमतरता असल्यास फुले अकाली गळतात आणि नविन फांद्यांची टोक जळाल्यासारखी दिसतात किंवा वळतात. फळे बारीक आणि खाण्यायोग्य नसतात आणि काकडी, मिरची आणि टोमॅटोच्या बाबतीत, फळांच्या बुडाला कुज विकसित होते. बियाण्याची उगवण क्षमता कमी असते.
  • पिकांना खत देताना कॅल्शिअम युक्त खतांचा वापर करावा तसेच विद्रव्य खते कॅल्शिअम नायट्रेट ४५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ वेळेस फवारणी करावी. 
  • swikruti agro #कॅल्शिअम नायट्रेट #अन्नद्रव्य_कमतरता
  • @swikruti agro clinic 
  • swikruti

Saturday, May 18, 2019


#शिमला_मिरची पिकामध्ये तुडतुडा बीटल पानांवर बारीक बंदुकीच्या गोळीसारखे छिद्र (१-२ मि.मी.) आणि खाल्याने नुकसानाची लक्षणे दिसतात.किड्यांचा रंग गडद असतो, काही वेळा ते चमकदार किंवा चकचकीत असतात..प्रौढ पाने खातात. पानांवर छोट्या विखुरलेल्या बंदुकीच्या गोळीच्या छिद्रांसारखी छिद्रे (१-२ मि. मी.) आणि पानाच्या कडेने चावल्यामुळे आरपार नसलेले खड्डे दिसतात. प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या आजुबाजुला थोडा पिवळेपणा येऊ शकतो प्रादुर्भाव नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रिड ७०% डब्लूजी ६ ग्राम किंवा थियामिथोक्साम २५% डब्लूजी १५ मिली १० दिवसाच्या अंतराने आलटून-पालडून फवारणी करावी.
#शिमला मिरची #बीटल #
 swikruti agro clinic 
@swikrutiagro
 

Friday, May 17, 2019


#मिरची - फळकुज आणि फांद्या वाळणे
- मिरची पिकामध्ये कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे फळकुज व फांद्या वाळणे हा प्रादुर्भाव होतो. दमट हवामानात रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेंड्यापासून होते. प्रथम शेंडे मरतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच फांद्या आणि पानावर ठिपके दिसतात.
- रोगाची लक्षणे दिसताच शेंडे मोडून त्याचा नाश करावा.
- प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ७५% डब्ल्यू पी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्ल्यू पी यापैकी एक ४० ते ४५ ग्रॅम १५ लीटर पाण्यात मिसळून रोग दिसताच १० ते १२ दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळेस आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/


https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg



फळांची गळ ही नैसर्गिक परिस्थिती, पाण्याची कमतरता,अन्नद्रव्य कमतरता,संजीवकांचा अभाव , रोग व किडीं प्रादुर्भाव या कारणामुळे होते.
#नैसर्गिक_फळगळ:
- बहरामध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्ण तापमानात एकदम वाढ होऊन फळे गळतात, या कालावधीत दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असल्यामुळे नैसर्गिकरीत्या फळगळ होते.
#वातावरणाचा_परिणाम:
- तापमान, आर्द्रता आणि वारा या बाबी फळगळतीस कारणीभूत ठरतात. एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे हवेतील आर्द्रतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बहराच्या फळांची गळ होते.
#अनियमित_पाणीपुरवठा:
-फळधारण झाल्यानंतर पाण्याचे कमी जास्त प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाल्यास फळगळ होते .
-बागेत पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते.
#रोग_व_किडी_प्रादुर्भाव :
-रोग व किडी प्रादुर्भाव झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात फळगळ होते
- बुरशीची फुलांच्या बीजांडावर लागण होऊन फळांची गळ होते.
#सूक्ष्म_अन्नद्रव्य_कमतरता:
-जमिनीत चुना आणि जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणावर फळगळ होते
- झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळगळीमुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
#संत्रा_फळगळ_नियत्रंण_उपाययोजना:
१)खताचे व्यवस्थापन झाडाचे वय,वाढ शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे,युरियाची मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी .
२)पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी झाडास द्यावे ठिबक सिचन असल्यास फायदेशीर ठरते.
३)पावसाळ्यात बागेत पाणी साचू देऊ नये,पाणी साचत असल्यास चर खणून पाणी काढून द्यावे.
४)किडी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशक + गूळ मिसळून फवारणी करावी.खराब झालेली फळे काढून नष्ट करावी.
५)फळधारणा अवस्थेत असताना फळगळ नियंत्रणासाठी जिबरॅलिक असिड १.५ ग्राम + बाविस्टीन १०० ग्राम +युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फळधारणेपासून ते फळकाढणी अगोदर १० दिवस १ महिन्याच्या अंतराने फवारणी करावी.
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/



#डाळिंब पिकामध्ये एकरी ठिबकमध्ये १२ :६१:०० -४ किलो ४ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे फवारणीसाठी प्लानोफिक्स ५ मिली +सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. फुलातील स्ञी - केशरांपर्यंत वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते. १) २०० ली. पाण्यात २ कि. गुळ व २-३ ली. ताक या प्रमाणात गर्भ कळीच्या अवस्थेपासुन ५-८दिवसांनी ३-४ फवारण्या कराव्यात.२) एका मडक्यात गुळ ५०० ग्रॅम व पानी ३-५ ली या प्रमाणात दूपारी बागेच्या आजुबाजुला ठेवावी.३) बागेच्या आसपास गाजर वा कांदयाचा बियाणे प्लॉट असल्यास मधमाशा आकर्षित होतात.४) बऱ्याच ठिकाणी बेदाणे झाडाला लटकवत ठेवुन मधमाशांना आकर्षित करण्यात येते.५) बागेतील काही झाडांच्या पानांना गावरान मध लावले असता मोठ्या प्रमाणात मधमाशी आकर्षित होते.
#swikrutiagroclinic #डाळिंब #फुलकळी
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/ 
@swikrutiagro

Thursday, May 16, 2019

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:

#मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:
*लष्करी अळीची ओळख आणि जीवनक्रम* :
- किडीचा पतंग करड्या रंगाचा असतो. मादी पतंग मक्याच्या पोंग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्यात अंडी घालते. मादीचा सर्वसाधारण काळ १० दिवसाचा असतो. एक मादी सरासरी १२००-१८०० अंडी घालते.
- प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोवळ्या पानावर उपजीविका करते. ही अवस्था साधारणपणे १४ ते २१ दिवसाची असते.
- वाढीच्या टप्प्यात अळीचा अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. तसेच डोक्यावर Y हे इंग्रजी अक्षर पांढऱ्या रंगात उलटा स्पष्ट दिसतो. ही अवस्था ३ ते ४ दिवसाची असते. नंतर अळी कोषावस्थेत जाण्यासाठी  जमिनीत शिरते.
*नुकसानीचा प्रकार:*
- ही किड मका पिकाचे पान खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेत अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करते. एका बाजूने खरडून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात.
- दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत पानाला छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिरेकडे पाने खायला सुरुवात करतात.
- पोंग्यामध्ये असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर एकाच रेषेत गोल छिद्रे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळी अधाशीपणे झाडाची पाने खाऊन फक्त शिराच ठेवतात.
- मका पिकात सुरुवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो
*एकात्मिक व्यवस्थापन*:
- मका पिकामध्ये शेतातील काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावी, कारण त्यामध्येच ही अळी सुप्तावस्थेत राहते.
- पोंगे मर दिसताच मक्याची झाडे काढून नष्ट करावीत.
- किडीचा पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी एकरी एका प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- लागवडीनंतर २० दिवसांनी फोरेटचे (१० टक्के) ५ ते ६ दाणे पोंग्यात टाकावे.
*रासायनिक नियंत्रण*:
- अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये थायमेथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहेलोथ्रीन ९.५ झेड सी% (अलिका १५ मिली)
- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास (डायक्लोरोव्हास ७६% इ सी  + स्पिनोसॅड ४५% एस सी(नुवान २० मिली + ट्रेसर ७ मिली))
किंवा डेल्टामीथ्रीन ११% इ सी (डेसीस १५ मिली) आलटून पालटून ८ ते १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- भुसा १० किलो + गूळ २ किलो एकत्र करून गोळे तयार करावे. त्यामध्ये थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी (लार्विन) १०० ग्रॅम मिसळून लहान गोळे तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकावे.
@swikrutiagro