#मिरची_लागवड :-
-मिरची हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे ,सध्यपरिस्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक घेतले जाते, मिरचीमध्ये अ. व क. जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्वाचे मसाल्याचे पिक आहे.
#लागवडीचा_हंगाम_व_जमीन :-
खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी.
मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हाळयात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.
हिरव्या मिरचीसाठी ज्वाला, एन. पी. - 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी. उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. - 46 या जातींची निवड करावी. रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी.इतर लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाणाची निवड करावी )
-एकरी बियाणे ४०० ते ६०० ग्राम
-लागवडीसाठी अंतर उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्या जातींची लागवड ६० बाय ४५ सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५ सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्दतीवर लागवड करावी.
- रोपे गादीवाफयातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १० लिटर पाण्यात २० मिली क्लोरोपायरीफॉस + २५ ग्रॅम एम ४५ +३० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावेत.
#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-
पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .
- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार १८:४६:०० -१०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो + कोसावेट ३ किलो एकरी द्यावे.
- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार)
- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम द्यावे.
- विद्राव्य खत ठिबकमधून १९:१९:१९ -३ किलो + युरिया १.५ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )
- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.
- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५ फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे.
- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने काढणीपर्यंत करावी.
-२५व्या दिवशी अलिका १० मिली + स्कोर ८ मिली /१५ लिटर
-विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २५ ते ५० दिवस )
-३२व्या दिवशी कोसावेट ३ किलो + मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून द्यावे.
-४० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(१२:६१:०० बरोबर देऊ नये )
-४५ दिवशी ट्रॅकोडर्मा ठिबकमधुन सोडावे.
- विद्राव्य खत ठिबकमधून १३:४०:१३ -४ किलो किंवा (१२:६१:०० २ किलो + १३:००:४५ -२ किलो ) ४ दिवसाच्या अंतराने आवश्यकते प्रमाणे द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५० ते ११० दिवस )
-५५ व्या व ६५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्राम / १५ लिटर
- ५५ ते ६० दिवसादरम्यान झाडांना मातीची भर देऊन घ्यावी.
- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे
-आवश्यक फवारणी मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम + बोरॉन १ ग्राम प्रति लिटर १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी
-७२ व्या दिवशी ओबेरोन १५ मिली /१५ लिटर
-८५ दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(विद्राव्य खताबरोबर देऊ नये )
-वातावरणातील रोग व किडी सध्यपरिस्थितीनुसार फवारणी घ्यावी
#काढणी_व_उत्पादन :-
हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरु झाल्यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे १० ते १२ तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी.जातीपरत्वे ( बागायती) हिरव्या मिरच्यांचे एकरी ३२ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते. वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन एकरी ३,५ ते ४ क्विंटल निघते.
#मिरची_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खतव्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #chilli_planting
#swikrutiagroclinic
Swikruti Agro Clinic
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
https: /t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg
https://www.instagram.com/swikruti.agro
https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6
📞 https://bit.ly/2miyhzj
धन्यवाद !








