Monday, December 28, 2020

#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण :

 


#हरभरा #घाटे #अळी #नियत्रंण : 

सद्यपरिस्थितीत #ढगाळ वातावरणामुळे हिरव्या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो .

#शेतक-यांनी #पिकाचे निरीक्षण करून  किडींचा #प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोच्यावर आल्यानंतर सर्वप्रथम #वनस्पतिजन्य किंवा #जैविक  #कीटकनाशकांना #प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी #निंबोळी #अर्क ५ टक्के किंवा #ऑझंड़ीरेंक्टीन ३०० #पीपीएम ५०#मिलि. प्रति १०  #लिटर पाणी किंवा

खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून #साध्या (#नॅपसॅक) #पंपाने #फवारणी करावी. 

#पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे #प्रमाण #तिप्पट करावे. 

#आवश्यकता भासल्यास #दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.


१) #क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं.


२) #इमामेक्टिन #बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम


३) #डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि. 


४) #लॅमडा #साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रवाही १० मिलेि.


५) #क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३  मिली      

    

अधिक माहिती साठी संपर्क

📲*https://bit.ly/2miyhzj*


#स्विकृती_अॅग्रो_क्लिनिक #swikrutiagro #swikrutiagroclinic #agro #agri #agriculture  #agriculturelife #agribusiness #agricultural

Sunday, November 22, 2020

#मिरची_लागवड



 #मिरची_लागवड :-

-मिरची हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे ,सध्यपरिस्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक घेतले जाते, मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे.

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन :-

खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी.

मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हिरव्या मिरचीसाठी ज्वाला, एन. पी. - 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी. उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. - 46 या जातींची निवड करावी. रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी.इतर लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाणाची निवड करावी )

-एकरी बियाणे ४०० ते ६०० ग्राम 

-लागवडीसाठी अंतर उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड ६० बाय ४५  सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५  सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी.

- रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १०  लिटर पाण्‍यात २० मिली क्लोरोपायरीफॉस + २५  ग्रॅम एम ४५  +३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक ८० टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार १८:४६:०० -१०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो + कोसावेट ३ किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो + युरिया १.५ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५ फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने काढणीपर्यंत करावी.

-२५व्या दिवशी अलिका १० मिली + स्कोर ८ मिली /१५ लिटर

-विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २५ ते ५० दिवस )

-३२व्या दिवशी कोसावेट ३ किलो + मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून द्यावे.

-४० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(१२:६१:०० बरोबर देऊ नये )

-४५ दिवशी ट्रॅकोडर्मा ठिबकमधुन सोडावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:४०:१३ -४ किलो किंवा  (१२:६१:०० २ किलो + १३:००:४५ -२ किलो ) ४ दिवसाच्या अंतराने आवश्यकते प्रमाणे द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५० ते ११० दिवस )

-५५ व्या व ६५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्राम / १५ लिटर 

- ५५ ते ६० दिवसादरम्यान झाडांना मातीची भर देऊन घ्यावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-आवश्यक फवारणी मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर  कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम + बोरॉन १ ग्राम प्रति लिटर  १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी 

-७२ व्या दिवशी ओबेरोन १५ मिली /१५ लिटर

-८५  दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(विद्राव्य खताबरोबर देऊ नये )

-वातावरणातील रोग व किडी सध्यपरिस्थितीनुसार फवारणी घ्यावी

#काढणी_व_उत्पादन :-

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्या फळांची तोडणी देठासह ८ ते १० दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे १० ते १२ तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे एकरी ३२ ते ४०  क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन एकरी  ३,५  ते ४ क्विंटल निघते.

#मिरची_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खतव्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #chilli_planting   

 #swikrutiagroclinic 


Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https: /t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://forms.gle/yjWw7Fy5cJJi9aex6 

 📞 https://bit.ly/2miyhzj

                                   धन्यवाद !

Tuesday, November 10, 2020

#टोमॅटो_लागवड




 #टोमॅटो_लागवड :- 

-टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिके आहे ,महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी टोमॅटो पीक घेता येते ,सद्यपरिस्थिती नाशिक ,पुणे,सातारा ,सांगली , नागपूर ,चंद्रपूर ,अहमदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. 

#लागवडीचा_हंगाम_व_जमीन  :- खरीप जून -जुलै , रब्बी सप्टेंबर - ऑक्टोबर ,उन्हाळी डिसेंबर -जानेवारी.

टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.

#लागवडीसाठी_सुधारित_वाण :-पुसा गौरव ,रोमा ,अर्का विकास,फुले राजा ,पुसा रुबी,पंजाब केसरी, नामधारी २५३५.अभिनव,अविनाश,आयुष्यमान  २ ,रुपाली ,वैशाली ,इ लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार जातीची निवड करावी ) 

- एकरी बियाणे १०० ते १२० ग्राम 

- लागवडीसाठी अंतर खरीप व रब्बी ९० बाय ६० सेमी उन्हाळी ६० बाय ४५ सेमी .

#खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार युरिया १५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट ३५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो +निंबोळी खत २०० किलो एकरी द्यावे.

- गादीवाफा ओला करून घ्यावा या वेळेस ठिबकमधून सुडोमोनास द्यावे.रोप लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + साफ / मेटको ५०० ग्राम + ह्यूमिक ५०० ग्राम द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५   फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे. 

- १५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

- ३० ते ३५ दिवसादरम्यान झाडाला वळण व आधार देणे.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १२:६१:०० ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ३१ ते ५० दिवस )

- ३५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने २ वेळेस द्यावे.

- ४५ व्या दिवशी ठिबकमधून  मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो (१२:६१:०० सोबत देऊ नये ) 

- विद्राव्य खत ठिबकमधून १३:००:४५  ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ५० ते ७० दिवस )

- ५० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- ६० ते ६५ व्या दिवशी ह्यूमिक पॉवर ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे 

-   पुढील तोडणीला १२:६१:०० २ किलो + १३:००:४५ २ किलो या प्रमाणात विद्राव्य खते चालू ठेवावी 

#उत्पादन :- जातीपरत्वे एकरी सरासरी उत्पादन ३० ते ४५ क्विंटल येते तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस आधी कीटकनाशक फवारणी करू नये ,६५ ते ७० दिवसांनी तोडणी सुरु होते.तोडणी दिवसाआड करावी.

#टोमॅटो_लागवड #लागवडीचा_हंगाम_व_जमीन #खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन #Tomato_planting   #उत्पादन  #swikrutiagroclinic 

 Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

https://www.instagram.com/swikruti.agro

https://bit.ly/2miyhzj

Friday, November 6, 2020




 #कलिंगड_लागवड :-


#लागवडीचा_कालावधी_व_जमीन :-

उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. कडक उन्हाळयाचा व भर पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते.

 वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

 - दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो 

- या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.

#जाती :-

शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, किरण १, किरण २, पूनम, ऑगस्टा या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० -४०० ग्रॅम बियाणे लागते.

#रोपवाटिका :-

- लागवडीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी पेरून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे.सुमारे ८ – १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते.रोपे उगवून आल्यानंतर ३ -४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत.

- मर होऊ नये म्हणून दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड  दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी 

- साधारणतः १६ ते १८ दिवसांनी पुनर्लागवड करावी.

#खत_व्यवस्थापन :-

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

- गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार ,१८:४६:०० -५० किलो ,पोटॅश ५० किलो ,कोसावेट ३ किलो ,फोलिडोल ५ किलोएकरी द्यावे.

- गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी  मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे ४ ते ५ रोल लागतात.रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० से.मी. अंतरावर १० से.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत.

- गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार) 

- ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के  ५०० ग्राम द्यावे. 

- आवश्यक फवारणी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून लागवडीपासून काढणीपर्यंत २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून  १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने  ७ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते २५दिवस )

- ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- १५ व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

- विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २० ते ३५ दिवस )

- २५ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

- ३० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

-३५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून ००:५२:३४- ३ किलो - ३ दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ३६ ते ५० दिवस ) 

- ५१ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.

- विद्राव्य खत ठिबकमधून किलो १३:००:४५ -३ किलो ३  दिवसाच्या अंतराने ५  वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५१  ते ६५ दिवस ) 

- ६५ व्या दिवशी पोटॅशिअम सोनाईट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.

#रोग_व_किडी_व्यवस्थापन :-

 - केवडा / मर - मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ,भुरी - डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल.

-फळमाशी - कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. क्यूल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. पिकावर व जमिनीवर मॅलॅथीऑनची ०.१ % फवारणी करावी. रसशोषणाऱ्या किडी - इमिडाक्लोप्रिड (१८.५ एस.सी.). किंवा फिप्रोनील (५ ई.सी.) बुरशीनाशक व कीटकनाशक आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

#काढणी_व_उत्पादन:

- फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात.

- फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असाआवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असाआवाज येतो.कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते.

- साधारणपणे बियाणे लागवडीपासून  ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.

- साधारणतः जातीनिहाय एकरी ३० ते ४९ टन उत्पादन मिळते.


#मार्गदर्शक_Swikruti_Agro

  

Swikruti Agro Clinic

 

#swikrutiagro #swikrutiagroclinic   #watermelon_planting   #swikruti_agro #watermelon #कलिंगड #टरबूज


 https://www.facebook.com/swikrutiagroclinic/


📞   https://bit.ly/2miyhzj

Sunday, November 1, 2020

#काकडी_लागवड


 #काकडी_लागवड 
#लागवड_कालावधी_व_जमीन : काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून - जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.जमीन थोडी रेतीयुक्त असेल तर पिक चांगले येते.
#जाती - लागवडीसाठी फुले हेमांगी, फुले शुभांगी, जपान लॉंग ग्रीन, बलराम खीरा, प्रिय हे सुधारित वाण आहेत.
#खत_व्यवस्थापन : पूर्व मशागत करताना एकरी आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.काकडी पिकाकरिता जमिनीतुन द्यावयाचे रासायनिक खत प्रमाण एकरी  (शिफारस) ४५ किलो युरिया,१२० किलो सुपर फाँस्फेट,३० किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.
-काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे एकरी अर्धा किलो बियाणे लागते.
-लागवडीनंतर एकरी  ७ व्या दिवशी साफ ५०० ग्राम + अक्टरा २५० मिली+ ह्यूमिक ५०० ग्राम आळवणी करावी १० व्या दिवसानंतर १९:१९:१९ - ३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे ३० व्या दिवसानंतर १२:६१:०० -३ किलो ३ वेळा द्यावे.आवश्यक खतमात्रा  कॅल्शिअम नायट्रेट २ किलो + बोरॉन २० टक्के ५०० ग्राम(१२:६१:००  ह्या विद्राव्य खतांसोबत देऊ नये ) ठिबकमधून १५ दिवसाच्या अंतराने २ वेळेस  द्यावे. ४० व्या दिवसापासून १२:६१:०० २ किलो +१३:००:४५ -२ किलो ५ वेळेस द्यावे  तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
#रोग_व_किडी : - रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे. फळमाशी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नुवोन २० मिली + गूळ ५० ग्राम १५ लीटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.गुळाकडे फळमाशी आकर्षित होऊन नियंत्रण लवकर होण्यास मदत होते.प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केवडा, भुरी या बुरशी जन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार  फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता बदलून बदलून फवारावे. 
-सुमारे दीड महिन्याने काकड्या तोडणीस येतात अंदाजे १२ ते १५ तोडण्या होतात.
#उत्पादन :- एकरी सात ते दहा टन होते . 
-संकरीत काकडीचे वजन २०० ते २५० ग्रॅम भरते तर एकरी उत्पादन १२ ते १५ टन पर्यंत मिळते.
#काकडी_लागवड #फळमाशी.#रोग_व_किडी #खत_व्यवस्थापन #लागवड_कालावधी_व_जमीन  #उत्पादन  #cucumber_planting 
#swikrutiagroclinic 

Swikruti Agro Clinic

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

https://t.me/joinchat/LE-ohRN3HY_-Nvz4ID5Hrg

📞https://bit.ly/2miyhzj

Thursday, October 29, 2020

#सेंद्रिय_शेती

सेंद्रिय_शेतीच्या नावाखाली कंपनी प्रतिनिधी साखळी विपणन पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहचवत असतात. 

सदर फोटो ( या सारख्या सेंद्रिय  विविध कंपनी आहेत )  मध्ये रोप व  दिवस यांची पडताळणी करावी . 

संदर्भासाठी खालील माहिती पडताळणी करा. 


https://m.facebook.com/story.php?story_fbid=2730979833661426&id=2170549573037791



Wednesday, October 28, 2020

#shetkari

 काळ्या मातीत बियाणे टाकून आस्मानी आणि सुलतानी संकटाचं चँलेंज स्वीकारायला शेतकऱ्यांचं काळीज असावं लागत!


#ओला_दुष्काळ 

#शेतकरी_वाचवा

https://www.facebook.com/swikrutiagroclinic/

#swikrutiagro #swikrutiagroclinic #Onion 



📱https://bit.ly/2miyhzj

Monday, October 26, 2020

#बटाट्याचे #एकरी #१८ #टन #उत्पादन

आधुनिक पद्धतीने शेती करीत बटाट्याचे एकरी १७ ते १८ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन तंत्रशुद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग करून खोडद येथील अंगराज कुचिक यांनी भरघोस पीक घेतले आहे. हा आधुनिक यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकरी बटाटा लागवडीकडे वळू लागले आहेत. एकरी १९ ते २० टन उत्पादन मिळवण्याचे कूचिक यांचे उद्दिष्ट होते.

हंगाम लागवडीची वेळ / काढणीची वेळ
खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा
सप्टेंबर-ऑक्टोबर
रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा -- फेब्रुवारी-मार्च
पुणे- नारायणगाव खोडद येथील प्रगतशील शेतकरी अंगराज कुचीक कुटुंबाचा वारसा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करत एकरी १८ टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कुचिक यांची नारायणगावपासून १० किलोमीटर अंतरावर खोडद येथे शेती आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत एकच एक पीक घेत नाहीत. गवार, कोबी, बीट, कांदा, ऊस अशी विविध पिके घेतात.
त्यांच्या आजूबाजूला ऊस शेती असतानाही ते केवळ ऊस लागवड करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्षभर वेगवेगळी पिके घेऊन भरघोस उत्पादन घेतात.
बटाटा लागवडीविषयी कूचीक सांगतात की, लागवडीपासून काढणीपर्यंत अतिशय नियोजनबद्ध लक्ष दिले. यासाठी जमीन कोळपून घेऊन भुसभुशीत केली. त्यानंतर पुन्हा एकदा आलटून-पालटून घेतली.
जमीन भुसभुशीत केल्यामुळे बटाट्याची मुळे खोलपर्यंत जाण्यास मदत होते. बटाट्याची मुळे साधारणत: ३० ते ३५ सेंटिमीटपर्यंत खोल जातात. त्यामुळे बटाट्याची वाढ चांगली होऊन तो पोसण्यासाठी खोल नांगरट फायदेशीर ठरते.
१०:२६:००-१०० किलो + युरिया ५० किलो +पोटॅश ५० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो या प्रमाणात खत मात्रा दिली. सहा इंच खोलीवर दोन बटाट्यांत नऊ ते दहा इंच व दोन ओळींत १५ इंच अंतर ठेवून लागवड केली. प्रमाणबद्ध पाण्याचे नियोजन केले दिवसाआड पाणी दिल्याने खताचे प्रमाण कमी लागले.
पिकांच्या संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी केली.लागवड करताना ती यांत्रिक पद्धतीने न करता मजूर लावूनच करून घेतली. लागवडीनंतर तण वाढू नये, यासाठी साधारणत: आठवडाभरात तणनाशक फवारले. व हलकीशी खुरपणी केली
त्यानंतर महिनाभराने एकरी ५ किलो कॅल्शिअम नायट्रेट व १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले. तसेच २० ते ४५ दिवसांच्या दरम्यान विद्राव्य खताची मात्रा दिली कोणतेही पीक घेताना पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते.
पिकाला वेळेवर आणि योग्य तेवढे पाणी मिळाले पाहिजे ज्या दिवशी ढगाळ हवामान असेल, त्या दिवशी तर पाणी देणे बंद ठेवले. या काळात पाणी बंद न ठेवल्यास ‘उशिराचा करपा’ येण्याची शक्यता असते. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्यास एकदम जास्त पाणी देणे फायद्याचे ठरते. त्यानंतर तीन-चार दिवस पाणी ठेवा. यामुळे करपा रोगाला दूर ठेवता येते. पोषक हवामान असतानाही पाण्याचे योग्य नियंत्रण केले, तर करपा रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पीक स्वत:च त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनते.
- संपूर्ण कालावधीत तीन वेळा कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. सर्वसाधारणपणे पीक ३० दिवसांचे झाल्यावर पहिली, ४५ दिवसांचे झाल्यावर दुसरी व ५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली.
५५ ते ६० दिवसांचे असताना आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी केली,
-बटाटा पीक साधारणत: तीन ते साडतीन महिन्यांत काढणीस येते.
- काढणीआधी १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद केले. याचा फायदा असा झाला की, बटाट्याची साल परिपक्व होण्यास मदत झाली आणि ओलसरपणाही कमी झाला. काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाची कापणी करून जमीन साफ केली. त्यानंतर लाकडी बळीराम घालून काढणी केली.

मार्गदर्शन - स्वीकृती आग्रो क्लिनिक